राहुल गांधींनी हुतात्म्यांची आणि देशाची माफी मागावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |




अमित शाह यांचा काँग्रेसाध्यक्षांवर जबरदस्त वार


नवी दिल्ली : पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्याची नियमित होणारी सामान्य घटनाअशी संभावना करणार्‍या काँग्रेसनेते सॅम पित्रोदा यांच्या विधानावरुन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी थेट राहुल गांधी यांच्यावरच वार केला. अमित शाह म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांनी सॅम पित्रोदा यांच्या विधानावरुन हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांची आणि जनतेची माफी मागितली पाहिजे. ते म्हणाले की, विरोधानंतर एकदा केलेल्या विधानावर सारवासारव करुन काहीही होणार नाही. देशाच्या जनतेला काँग्रेसचे धोरण चांगलेच माहिती आणि म्हणूनच. त्यांनी काँग्रेसलाच आता अडगळीत टाकले आहे. शाह पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या परराष्ट्र विभागाचे संयोजक आणि निवडणूक जाहीरनामा समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांचे विधान अनेकाने चिंता जन्माला घालणारा आहे.

 

शाह म्हणाले की, पित्रोदा म्हणाले की, मुठभर लोकांच्या कृत्यांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरता येणार नाही. म्हणूनच आता राहुल गांधी यांनी सांगावे की, पित्रोदा यांच्या चर्चेतून दहशतवादापासून मुक्ती या धोरणावर त्यांची काय भूमिका आहे? काँग्रेसवर तिखट शब्दांत हल्ला करत अमित शाह यांनी आव्हान दिले की, काँग्रेस अध्यक्षांनीच आता हे स्पष्ट करु सांगावे की, पुलवामातील निर्घृण हल्ल्याला तेदेखील सामान्य घटनाच मानतात का? सर्जिकल स्ट्राईकवेळी राहुल गांधींनी रक्ताचा सौदा अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती आणि आता ते एअर स्ट्राईकवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल गांधींनी यासाठी देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे.

 

काँग्रेसच्या विधानांनी वाढले दहशतवाद्यांचे मनोधैर्य

 

एअर स्ट्राईकबाबतच्या काँग्रेसच्या विधानांमुळे हुतात्म्यांचा अपमान झाला असून देशाला छिन्नविछिन्न करणार्‍यांचे मनोधैर्य वाढले आहे. 7 मार्चला स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एअर स्ट्राईकवर केल्या जात असलेल्या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजे, असे म्हटले होते. म्हणूनच मी त्यांना विचारतो की, काँग्रेस अध्यक्षांना कशाची उत्तरे पाहिजे आहेत? प्रश्न कोण उभे करत आहेत? ते अपरोक्षपणे कोणाचे समर्थन करत आहेत?, असा प्रश्नांचा भडीमार करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.

 

...म्हणूनच जनतेने त्यांना अडगळीत टाकले

 

सॅम पित्रोदा यांच्या विधानानंतर काँग्रेसने ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते. त्यावर शाह म्हणाले की, राजकारणात काहीही वैयक्तीक नसते. मी काँग्रेसला सल्ला देतो की, तुम्हाला जनतेने चांगल्याप्रकारे ओळखले आहे, म्हणूनच या जनतेने तुम्हाला अडगळीत टाकले. कधी पी. चिदंबरम, कधी कपिल सिब्बल, कधी नवज्योतसिंग सिद्धू, कधी मणीशंकर अय्यर आणि कधी संदीप दीक्षितसारख्या माणसांच्या विधानांना वैयक्तिक ठरवले जाते. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. राहुल गांधींच्याच रणनितीचा हा एक भाग असून काँग्रेस अध्यक्षांनी आता स्वतःच याप्रकरणी माफी मागितली पाहिजे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@