'केसरी'ने २ दिवसात कमावला ३७.७८ कोटींचा गल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याचा केसरी हा अतिशय महत्वाकांक्षी चित्रपट. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या तसेच परीक्षकांचीदेखील वाहवाही मिळवली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली. परंतु, चित्रपटाला पायरसीचे ग्रहण लागल्यामुळे हा चित्रपट बोझ ऑफिसवर काय कमाल करतो याकडे सगळ्यांच्या नजारा होत्या. आत्ता या चित्रपटाची आकडेवारी समोर आली असून फक्त २ दिवसात ३८ कोटी कमावले आहेत.

 

गुरुवारी धुळवडीच्या दिवशी अक्षय कुमारचा 'केसरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याकाळातही या चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. समोर आलेल्या आकड्यांनुसार, गुरुवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने २१ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर दुसऱ्यादिवशी या चित्रपटाने १७ कोटींचा गल्ला जमवला आहे. असा अंदाज लावला जात आहे की, शनिवार आणि रविवार यादिवशी हा चित्रपट अनेक उचांक पार करेल. शीख समुदायात शौर्याच प्रतीक म्हणून नावाजली गेलेली अफगाणिस्तानमधील सारागढी किल्ल्यातील लढाई ही अक्षय कुमारच्या 'केसरी' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर जीवंत केली आहे. परिणीती चोप्राने देखील यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@