जयललितांच्या भूमिकेसाठी कंगनाची वर्णी
महा एमटीबी   23-Mar-2019


 


मुंबई : जनमानसातील ‘अम्मा’ अशी प्रतिमा असलेल्या जयललिता यांनी राजकारण आणि चित्रपटसृष्टी अशा दोन्ही क्षेत्रांत आपली छाप उमटवली होती. १४ वर्षांहून अधिक काळ तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या जयललिता भारतीय राजकीय व्यवस्थेतील इतर स्त्री नेत्यांच्या तुलनेत नेहमीच वेगळ्या ठरल्या होत्या. त्यांच्या याच प्रवासावर आधारित चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून याविषयीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, यात जयललिता यांची भूमिका साकारण्याची संधी नेमकी कोणत्या अभिनेत्रीला मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. अशात आता हे नाव जाहीर झाले असून या बायोपिकमध्ये कंगना रनौत जयललितांच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तामिळ अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'थलाईवी' असे तामिळ तर 'जया' असे या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे नाव आहे. ए एल विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर 'मणिकर्णिका' आणि 'बाहुबली'सारख्या चित्रपटांचे लेखक के व्ही विजेंद्र प्रसाद यांनी या चरित्रपटाचे कथा लेखन केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat