पिनाकी घोष यांची लोकपाल पदाची शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांना देशाचे पहिले लोकपाल म्हणून शपथ दिली. याबरोबरच लोकपाल समितीच्या या शपथग्रहण सोहळ्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि सरन्यायाधीश रंजन गोगोई उपस्थित होते. न्यायमूर्ती घोष यांनी आंध्र प्रदेश न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, तसेच ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. न्यायमूर्ती घोष हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्यही आहेत.

 

पिनाकी यांच्या लोकपाल पदावरील नियुक्तीबरोबचबर न्यायिक सदस्य म्हणून न्या. दिलीप बी. भोसले, न्या. प्रदीपकुमार मोहंती, न्या. अभिलाषा कुमारी, न्या. अजयकुमार त्रिपाठी हे काम पाहणार आहेत. न्यायिक सदस्यांबरोबरच समितीत दिनेश कुमार जैन, अर्चना रामसुंदरम, महेंद्र सिंह आणि डॉ. इंद्रजीत प्रसाद गौतम यांचाही समावेश आहे.

 

घोष हे पुढील चार वर्ष घोष लोकपालचे अध्यक्ष असतील. लोकपालच्या अध्यक्षांना सरन्यायाधीशांइतकाच पगार आणि दर्जा असणार आहे. देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. घोष हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@