रेल्वेकडून उन्हाळी सुट्टीसाठी ६० विशेष गाड्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |



मुंबई : उन्हाळ्य़ाच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणाऱ्या बच्चेकंपनी आणि पालकांसाठी यंदा रेल्वे प्रशासनाने खुशखबर दिली आहे. मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्टीसाठी पाच एप्रिलपासून एकूण ६० मेल-एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

उन्हाळ्यातल्या सुट्टीच्या दिवसांत रेल्वे प्रवासात खूप गर्दी होते. म्हणून पर्यटकांसाठी विशेष गाड्या सोडण्याल्या जातील. सीएसएमटी आणि पुण्याहून कोचुवेली, एर्नाकुलम विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१४११ पुणे ते सावंतवाडीच्या विशेष १० फेऱ्या होणार आहेत. एप्रिल ते जूनपर्यंत दर शुक्रवारी पहाटे .५५ वाजता ही गाडी पुण्याहून सुटेल. तर गाडी क्रमांक ०१४१२ च्या सावंतवाडी ते पुणे विशेष १० फेऱ्या होणार आहेत.

 

एप्रिल ते जूनदरम्यान दर रविवारी ती रात्री साडेआठ वाजता सावंतवाडीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१०६५ सीएसएमटी ते कोचुवेली (साप्ताहिक) गाडी १५ एप्रिल ते जूनपर्यंत चालवली जाणार आहे. सीएसएमटीवरून ही गाडी सकाळी ११. वाजता सुटणार आहे. गाडी क्रमांक ०१०६६ कोचुवेली ते सीएसएमटी १६ एप्रिल ते जूनपर्यंत चालवली जाणार आहे. कोचुवेलीहून ही गाडी रात्री ११ वाजता सुटेल.

पनवेल ते सावंतवाडीसाठी विशेष
२० फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. ६ एप्रिल पासून ते जूनच्या कालावधीत ०१४१३ ही गाडी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी .१५ वाजता सुटणार असून ०१४१४ या सावंतवाडी ते पनवेलच्या २० फेऱ्या होणार आहे. दरम्यान, ५ एप्रिल ते जूनपर्यंत दर शुक्रवारी, शनिवारी रात्री वाजून ३० मिनिटांनी ही गाडी सावंतवाडीहून सुटणार आहे.

 

पुणे ते एर्नाकुलम हमसफर ही विशेष गाडी १५ एप्रिल पासून सुरु करण्यात येणार आहे. ३ जूनपर्यंत सेवा सुरु राहणार आहे. सायंकाळी .५५ वाजता पुण्याहून ही गाडी सुटून ०१४६८ ही एर्नाकुलम ते पुणे (साप्ताहिक) हमसफर विशेष गाडी १७ एप्रिल ते जूनपर्यंत चालू राहणार, ही दुपारी १२.२५ वाजता एर्नाकुलमहून सुटणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@