गुरुवारी डोंबिवलीत अनोखा रंगोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |


डोंबिवली : अनोख्या रंगोत्सवाची सुरुवात कृष्णपूजन करून होणार असून त्याचसोबत कृष्णभजन, कृष्णराधा नृत्य, गोफ, गाणी आणिविशेष उपस्थित असणाऱ्या सेलिब्रिटीबरोबर गप्पा असा भरगच्च कार्यक्रम धुळवडीनिमित्त डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

हिंदू संस्कृतीतील सण आणि परंपरांना नैसर्गिक कालचक्राची ठळक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे निसर्गात होणारे समविषम बदल आपल्या संस्कृतीतही त्याच अनुषंगाने प्रतिबिंबित होत असतात. शिशिर ऋतू, फाल्गुन महिन्याच्या गुलाबीथंडीला आपण निरोप देतो होळी पेटवून आणि वसंत ऋतूची चाहूल लागते म्हणून रंगांची उधळण करत धुळवड किंवा रंगपंचमीसाजरी करतो.

रंगांच्या माध्यमातून विद्रुपीकरण न करता त्याचाच कलात्मक वापर करणे, विकृतीतून कलाकृतीकडे आणि विद्रूपतेतुनसौंदर्याकडे या संकल्पनेला डोळ्यासमोर ठेवून आपण धुळवडीच्या दिवशी चेहऱ्यावर रंग फासण्याऐवजी शरीरावर चित्र
, नक्षी,टॅटू, आजूबाजूला ठेवलेल्या पॅनल बोर्ड, ड्रॉईंग बोर्डवर मनातील चित्र संकल्पना सुलेखन (कॅलिग्राफी) याद्वारे व्यक्त होण्याचे आवाहन यावेळी केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या अनोख्या रंगोत्सवाची सुरुवात कृष्णपूजन करून होणार असून त्याचसोबत कृष्णभजन, कृष्णराधा नृत्य, गोफ, गाणी आणिविशेष उपस्थित असणाऱ्या सेलिब्रिटीबरोबर गप्पा असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

कधी : गुरुवारी २१ मार्च सकाळी ९ ते १२

कुठे : आप्पा दातार चौक, फडके रोड, डोंबिवली पूर्व

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@