होमियोपॅथीक तपासणी भाग ११
महा एमटीबी   18-Mar-2019होमियोपॅथीक तपासणीमध्ये स्त्रीरुग्णांची माहिती घेत असताना ऋतुप्राप्तीपासूनते रजोनिवृत्तीपर्यंतच्या मोठ्या कालावधीची माहिती घेतली जाते. अर्थात, रुग्णाच्या वयानुसार, लक्षणानुसार व तक्रारीनुसारच ही माहिती घेतली जाते.

स्त्रियांना या कालावधीत अनेक स्थित्यंतरांना सामोरे जावे लागते. मासिकस्त्रावाच्या या माहितीमुळे चिकित्सकाला अनेक प्रकारच्या स्त्रीरोगांबद्दल माहिती मिळू शकते. त्यानुसार संभाव्य स्त्रीरोगही टाळता येऊ शकतात. उदा. जर एखाद्या स्त्रीने रोगाची लक्षणे सांगताना सांगितले की, मासिक पाळी बरेच दिवस राहते व फार मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. मग अशा लक्षणांवरून डॉक्टरला ‘फायब्राईड्स’ म्हणजेच गर्भाशयातील गाठी किंवा ‘एड्रोमेट्रियॉसिस’ इ. आजारांबद्दल शंका येऊ शकते. त्यानुसार योग्य ती तपासणी करून मग त्या आजाराचे अचूक निदान केले जाते. त्यासाठी केस टेकिंगमध्ये नीट माहिती घेणे गरजेचे असते. याबद्दल डॉक्टर रुग्णांना अनेक प्रश्न विचारतात. ते सर्व प्रश्न रुग्णाच्या आरोग्याशी संलग्न असतात व त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांना याबाबतीत सहकार्य करावे.

. मासिकस्त्राव किंवा मासिक पाळी नियमित येते की नाही? किंवा लवकर येते का किंवा फार उशिरा येते का, याची माहिती विचारली जाते.

. रक्तस्त्राव किती दिवसांपर्यंत चालू राहतो?

. मासिक पाळीमधील रक्तस्त्रावाचा रंग कसा असतो?

. कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होेतो का?

. पाळीच्या वेळी रक्ताच्या गुठळ्या पडतात का?

. मासिकस्त्रावाला दुर्गंध येतो का किंवा त्याचे चिवट असे डाग पडतात का?

यावरूनही अंतर्गत स्त्रीरोगाची माहिती डॉक्टरांना होऊ शकते. मासिक पाळी चालू होण्याआधी किंवा चालू असताना वेदना होतात का? हेसुद्धा पाहिले जाते. कारण, या वेदनेच्या लक्षणांवरून ’ऊूीाशपेीीहेशर’सारखे अनेक आजार समजू शकतात.

याशिवाय या आजाराशी शरीरातील इतर लक्षणांचा संबंध आहे का, हेदेखील पाहिले जाते. उदा. चेहर्‍यावरील मुरूम किंवा पुटकुळ्या मासिक पाळी चालू असताना वाढणे अथवा कमी होणे ही लक्षणे आपण बर्‍याचदा मुलींमध्ये पाहतो.

विवाह झाल्यांनतर मासिक पाळीत काही लक्षणीय बदल झाले आहेत का, हेसुद्धा विचारातघेतले जाते. त्याबरोबर रजोनिवृत्तीच्याजवळ असणार्‍या स्त्रियांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल हे तपासले जातात. कारण, हे बदल सांप्रेरिक बदलांमुळे घडत असतात. याचबरोबरीने श्वेतप्रदराचा त्रासही अभ्यासला जातो. श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून सफेद पाणी जाणे. हा त्रास अनेक स्त्रियांमध्ये दिसून येतो. श्वेतप्रदराच्या त्रासात स्त्री अवयवांना कंड सुटणे, जळजळणे किंवा जंतुसंसर्ग होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय ‘असाधारण श्वेतप्रदर’ हे अंतर्गत आजाराचे लक्षण असू शकते. उदा. सतत श्वेतप्रदराचा त्रास हा ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकाच्या असमतोलामुळे होत असतो. योनीमार्गाला जर कोणत्याही प्रकारे जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झाल्यास हा श्वेतपदर (Leukorrhea) दिसून येतो. काही महिला व मुलींमध्ये अतिश्रम किंवा राहणीमानाच्या चुकीच्या पद्धतींमुळे श्वेतप्रदराचा त्रास दिसून येतो. याशिवाय ‘शारीरिक अस्वच्छता’ हासुद्धा एक मुद्दा आहे, ज्यामुळे श्वेतप्रदरांसारखी लक्षणे दिसून येतात. याप्रमाणे जर होमियोपॅथीक तपासणी केली, तर एकही आजार नजरेआडहोत नाही व रुग्ण योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे बरा होतो.

क्रमश:

 
- डॉ. मंदार पाटकर  


माहितीच्या
महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat