हिंदू असल्याचे सांगत मुलाने केला विवाह : ‘आधार’ने केली पोलखोल
महा एमटीबी   14-Mar-2019


 


देवारिया : उत्तर प्रदेशातील देवारिया जिल्ह्यातील मुस्लीम युवकाने आपली ओळख लपवत एका हिंदू मुलीशी विवाह केला आहे. पीडितेने केलेल्या आरोपानुसार आरोपी तरुणाने तिच्याशी बनाव रचून संसार थाटला होता. तरूणीला मिळालेल्या आधारकार्डामुळे तो मुस्लीम असल्याचे तिला समजले.

 

पीडित युवतीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. देवारिया पोलीसांनी फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलिस अधिकारी वीर बहादुर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापासून ओळख लपवून हा तरुण राहत होता. त्यांचे कपरवारच्या पश्चिम टोला येथे एका भाड्याचे घर आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव रिझवान, असे आहे. त्याने आपली ओळख आशुतोष राय, अशी सांगत बनावट ओळखपत्र तयार केले आहे. तो एका औषधाच्या दुकानात कामाला असून कुशीनगर येथे कामानिमित्त या तरुणीशी त्याची ओळख झाली होती.


हिंदू धर्मीय असल्याची ओळख सांगत रिझवानने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि कपरवार गावातील एका मंदिरात बहरज येथील कपरवार गावातील एका मंदिरात त्यानी लग्न केले होते. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat