पडद्यावर पुन्हा एकदा अवतरणार अल्लाउद्दीन!
महा एमटीबी   14-Mar-2019

 

 
 
 
मुंबई : आजवर दंतकथांवर आधारित अनेक सिनेमे आले. अल्लाउद्दीन आणि जादुचा दिवा ही दंतकथा साकारण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेक सिनेदिग्दर्शकांनी केला. अल्लाउद्दीन आणि जिनीची ही दंतकथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
 
 
 

वॉल्ट डिस्नेचा हा सिनेमा असून हॉलिवुड स्टार विल स्मिथ जिनीच्या रुपात दिसणार आहे. मेना मसूद, नाओमी स्कॉट हे कलाकार प्रमुख भूमिकेत असतील. गे रिची यांनी अल्लाउद्दीन या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून येत्या २४ मे रोजी हा सिनेमा भारतात प्रदर्शित होईल. यापूर्वी १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉल्ट डिस्नेच्या अॅनिमेशनपटाचे रुपांतर या सिनेमात करण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat