कॉंग्रेसला धक्का : टॉम वडक्कन भाजपमध्ये
महा एमटीबी   14-Mar-2019नवी दिल्ली : टॉम वडक्कन यांनी गुरुवारी कॉंग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोनिया गांधी यांचे पूर्व सचिव असलेले टॉम वडक्कन यांनी कॉंग्रेस प्रवक्तेपदाचा प्रभार सांभाळला आहे. कॉंग्रेस देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसवर यावेळी केली.कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि संयुक्त पुरोगामी आघाडी प्रमुख सोनिया गांधी यांचे पूर्व सचिव असलेल्या टॉम वडक्कन यांचा भाजप प्रवेश हा कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवारी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत वडक्कन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

पश्चिम बंगालच्या राजकारणातही उलथापालथ झाली. तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही मोठा धक्का बसला आहे. आमदार अर्जून सिंह यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणाला नवे वळण येत आहे.माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat