देश जेव्हा दुःखात असतो तेव्हा राहुल गांधी खुश का असतात : रविशंकर प्रसाद
महा एमटीबी   14-Mar-2019 नवी दिल्ली : पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला चीनने वापरलेल्या विटोमुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव पुन्हा संयुक्त राष्ट्रात रखडला. यावरून राजकारण करणाऱ्या राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लक्ष्य केले. देश जेव्हा दुःखी असतो तेव्हाच तुम्ही खुश असता, अशी टीका त्यांनी केली.


राहुल गांधी यांचे ट्विट हे पाकिस्तानातील दहशतवाद्यांमध्ये चर्चेचा विषय ठरेल. पाकिस्तनी प्रसारमाध्यमे आणि दहशतवादी तुमचे ट्विट पाहून खुश असतील. राजकारण आणि परराष्ट्र धोरण यात अंतर असायला हवे. केवळ ट्विट करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्न सुटणारे नव्हेत. तुमच्या पूर्वजांच्या कारणास्तव हा चीन आज आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आहे, असे टीकास्त्र रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर सोडले.


चीन वगळता संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. चीनने मसूदला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने तो आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी होऊ शकला नाही. याचे सर्व देशाला दुःख आहे मात्र, तुम्ही यावर केवळ ट्विटरद्वारे राजकारण करून खुश आहात. २००९ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतानाही चीनने असाच खोटा घातला होता. राहुल गांधींजी तुमचे चीनशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत, डोकलामच्या वातावेळीही तुम्ही चीनमध्ये गेला होता. त्यावेळी भारताची परवानगीही तुम्ही घेतली नाही. मानसरोवर यात्रेवेळीही चीन दूतावास अधिकारी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सूक होते, तुमची राजकीय ताकद तुम्ही यावेळी का नाही वापरली, असा खोचक सवाल त्यांनी राहुल गांधींना यावेळी केला.माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat