राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; मावळचा सस्पेन्स कायम!
महा एमटीबी   14-Mar-2019
मुंबई : काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण १० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली आहे. पहिल्या यातील साताऱ्यातून उदयनराजे भोसले, रायगड येथून सुनील तटकरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, कोल्हापूर येथून धनंजय महाडिक, जवळगावातून गुलाबराव देवकर यांची नावे जाहीर झाले आहेत.

 

राष्ट्रवादीच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत दहा नावे समोर आले असले तरी बहुचर्चित अहमदनगर, माढा व मावळ मतदारसंघांच्या जागांबाबतचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राष्ट्रवादीने हातकणंगले मतदार संघ सोडला असून या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

 

राष्ट्रावादी काँग्रेसची जाहीर झालेली यादी (मतदारसंघ व उमेदवार)

 

बारामती - सुप्रिया सुळे

सातारा - उदयनराजे भोसले

रायगड - सुनील तटकरे

जळगाव - गुलाबराव देवकर

बुलडाणा - राजेंद्र शिंगणे

ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील

परभणी - राजेश विटेकर

ठाणे - आनंद परांजपे

कल्याण - बाबाजी बाळाराम पाटील

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat