भाजपचे ‘संघटन’ कामाला लागले!
महा एमटीबी   14-Mar-2019

 

 
 
 
 

निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपच्या २२ समित्यांची घोषणा

 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी आता भारतीय जनता पक्षाचे ‘संघटन’ पूर्ण जय्यत तयारीनिशी कामाला लागल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र भाजपतर्फेही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक व्यवस्थापनासाठी विविध २२ समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी झालेल्या बैठकीनंतर याबाबत माहिती देण्यात आली.

 

मुंबईत झालेल्या या बैठकीला राज्याचे वित्तमंत्री अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. अतुल भातखळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात भाजपने निवडणूक व्यवस्थापनासाठी विविध २२ समित्यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात या समित्या आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.

 

घोषणापत्र समितीची जबाबदारी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली असून व्हिजन डॉक्युमेंट समितीची जबाबदारी प्रवक्ते विश्वास पाठक यांना देण्यात आली आहे. प्रचार-प्रसिद्धी समितीची जबाबदारी आ. अतुल भातखळकर व प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडे तर विविध ठिकाणच्या रॅली समितीची जबाबदारी संभाजी पाटील-निलंगेकर आणि आ. सुरेश हाळवणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. निवडणूक संघटन समितीची जबाबदारी विजयराव पुराणिक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय संसदीय संमेलन, वर्गावर संमेलन, नव-मतदार अभियान, बुद्धीजीवी संमेलन केंद्र-राज्य समन्वय अशा विविध २२ समित्यांची व त्यांच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा यावेळी करण्यात आली.

 

महाराष्ट्र भाजपचे शिलेदार :

निवडणूक व्यवस्थापन समिती : खा. रावसाहेब पाटील-दानवे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार

घोषणा पत्र समिती : माधव भांडारी, पंकजा मुंडे

व्हिजन डॉक्युमेंट समिती : विश्वास पाठक

प्रचार-प्रसिद्धी समिती : आ. अतुल भातखळकर, केशव उपाध्ये

रॅली : संभाजी पाटील-निलंगेकर, आ. सुरेश हाळवणकर

संसदीय संमेलन : आ. सुजितसिंह ठाकूर, प्रवीण दटके

वर्गावर संमेलन : प्रा. राम शिंदे, विजय (भाई) गिरकर, प्रा. अशोक उईके

नवमतदार अभियान समिती : जयकुमार रावल, आ. योगेश टिळेकर

पारंपारिक अभियान समिती : आ. संजय (बाळा) भेगडे, स्मिता वाघ, शैलेश गोजमगुंडे

बुद्धीजीवी संमेलन : डॉ. रणजीत पाटील, प्रदीप रावत

विशेष संपर्क अभियान : आ. एकनाथ खडसे, शायना एन. सी., प्रकाश मेहता

निवडणूक संघटन : विजयराव पुराणिक

काँग्रेस कुशासनाविरोधात आरोपपत्र : विनोद तावडे, आ. डॉ. संजय कुटे, आ. अॅड. आशिष शेलार

सूचना संचार अभियान : अतुल शाह

लोकसहभाग : अॅड. माधवी नाईक, डॉ. भागवत कराड, आ. चैनसुख संचेती, आ. मनीषा चौधरी

साहित्य निर्माण : संजय फांजे, मिहीर कोटेचा, डॉ. दिनेश थिटे

कार्यक्रम आणि प्रवास : मुकुंद कुलकर्णी, लाधाराम नागवाणी

निवडणूक आयोग आणि कायदेविषयक : गोपाळ दळवी, अॅड. राजीव पांडे, प्रकाश बाळबुधे, अॅड. अमित देशपांडे

बूथ समन्वय समिती : आ. डॉ. रामदास आंबटकर

विशेष : प्रतापभाई आशर, आ. प्रसाद लाड, शरद चव्हाण

केंद्र-राज्य समन्वय : भरत राऊत, दत्ताजी मोहिते

वॉर रूम प्रमुख : मनोज पांगारकर, आशिष कुलकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat