मोदी समर्थक मूर्ख; काँग्रेसचे वादग्रस्त ट्विट
महा एमटीबी   14-Mar-2019मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थक मूर्ख असल्याचे वादग्रस्त ट्विट काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रमुख दिव्या स्पंदना हिने केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक मीम शेअर केले आहे. या मीममध्ये मोदींच्या तीन समर्थकांपैकी एकजण इतर दोघांइतकाच मूर्ख असल्याचे लिहिले आहे. यामुळे आता तिला मोदी समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

 

दिव्या हिच्या या वादग्रस्त ट्विटनंतर मोदी समर्थकांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. काँग्रेसकडे कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने आता हा उद्योग चालू केला का? असाही सवाल मोदी समर्थकांनी तिला विचारला आहे. तर अनेकांनी तिला तिच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

 

दिव्या स्पंदना ही तामिळ अभिनेत्री असून काँग्रेस पक्षाची माजी खासदार आहे. दिव्या ही राहुल गांधी यांची निकटवर्तीय मानली जाते. वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणे तिचा छंद असल्याचा टोला एका ट्विटर युजरने लगावला आहे. यापूर्वी तिने असेच एक ट्विट करत मोदी चोर असल्याचा उल्लेख केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat