चित्रपटानंतर पंतप्रधान मोदींवर येतेय वेब सिरीज
महा एमटीबी   13-Mar-2019


 


मुंबई : सध्या चित्रपट सृष्टीत चरित्रपटाचे वारे वाहत असताना अनेक राजकारण्यांचे जीवनपट पाहायला मिळाले. तसेच, आगामी काळात अनेक पाहायला मिळतही. मनमोहन सिंग, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येऊन गेले. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटाचीदेखील घोषणा करण्यात आली. आता पंतप्रधानांच्या आयुष्यावर आधारित वेब सिरीज येत आहे. एप्रिल महिन्यात ही वेब सिरीज प्रदर्शित होणार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आली.

 

मोदी असे या वेबसीरिजचे नाव असणार आहे. एप्रिलपासून ही सीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करत याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. 'You know the leader, but do you know the man?' असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. देशातील एका सामान्य माणसाचा भारताचा पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास या वेब सीरिजमध्ये दाखवला जाणार आहे.

 
 

मोदींच्या आयुष्यातील चढ-उतार, त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग या वेब सीरिजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. '१०२ नॉट आऊट' आणि 'ओह माय गॉड'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश शुक्ला या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. इरॉस नॉऊवर ही सीरिज पाहता येणार आहे. ही सीरिज १० भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat