ब्रेग्झिट करारावरील मतदानात थेरेसा मे दुसऱ्यांदा पराभव
महा एमटीबी   13-Mar-2019


 


नवी दिल्ली : ब्रिटनच्या संसदेमध्ये मंगळवारी दुसऱ्यांदा पंतप्रधान थेरेसा मे यांचा ब्रेग्झिट करारावरील मतदानात दुसऱ्यांदा पराभव झाला. यामुळे पंतप्रधान थेरेसा यांना दुसऱ्यांदा दणका बसला आहे. युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबतच्या ब्रेग्झिट करारावर ब्रिटनच्या संसदेमध्ये मंगळवारी मतदान झाले. हा प्रस्ताव ३९१ विरुद्ध २४२ मतांनी फेटाळण्यात आला आहे.

 

हा करार ब्रिटिश संसदेने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. या वेळी थेरेसा मे यांना १४९ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. मे यांच्या हुजूर पक्षाच्या ७५ खासदारांनी ब्रेग्झिटविरोधात मतदान केले. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यावेळी थेरेसा मे यांना कमी मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. जानेवारीमध्ये झालेल्या मतदानात मे यांना ४३२ विरुद्ध २०२ म्हणजे २३० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

 

ब्रिटनच्या जनतेने २०१६ मध्ये ब्रेग्झिटच्या बाजूने निसटता कौल दिल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या थेरेसा यांनी दोन वर्षे युरोपीय महासंघाशी वाटाघाटी केल्या. आता त्यांना दुसऱ्यांदा ब्रेग्झिट करारावरील मतदानात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat