पवार साहेब फेरविचार करा : रोहित पवार यांची भावनिक पोस्ट
महा एमटीबी   12-Mar-2019
मुंबई : माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कौटुंबिक चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले होते मात्र, आता कुटूंबातूनच त्यांना पुन्हा फेरविचार करण्याची विनंती त्यांचे दुसरे नातू व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. 'सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून साहेबांनी केलेल्या राजकारणाचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही आदर करतो. पण आदराच्या पुढेही एक प्रेम आहे. त्या प्रेमासाठी माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना वाटते की साहेबांनी निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा.'
शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्यासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पवार यांच्या कुटूंबातील अंतर्गत वादही समोर आणणारा आहे. रोहित पवार यांच्या नव्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय चर्चा रंगली आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat