कॉंग्रेसचा ‘हात’ धरणार नाही : प्रकाश आंबेडकर
महा एमटीबी   12-Mar-2019मुंबई : बहुजन वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरातून निवडणूक लढवणार असल्याचे सोमवारी जाहिर केले होते. त्यावेळीच ही शक्यता व्यक्त केली जात होती. आता मात्र, अधिकृतरित्या त्यांनी ही माहिती दिली आहे.

 

१५ मार्च रोजी राज्यातील सर्व ४८ लोकसभा जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. काँग्रेसबरोबरचे सर्व प्रस्ताव संपले, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या उमेदवारीमुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजप, राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी, अशी लढत होणार आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat