हिंदू धर्माच्या आस्थांविरोधात षडयंत्र; रा.स्व.संघाच्या बैठकीत प्रस्ताव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2019
Total Views |



ग्वाल्हेर : राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय बैठक रविवारी समाप्त झाली. या बैठकीच्या समारोप प्रसंगी शबरीमला मंदिराबाबतचा प्रस्ताव पारीत करण्यात आला. त्यानुसार, हिंदू आस्था आणि परंपरा आणि आस्थांचा अनादर करण्याचे योजनाबद्ध पद्धतीने षडयंत्र रचले जात असल्याचे या प्रस्तावात मांडण्यात आले. जालियनवाला बाग बलिदान शताब्दी आणि गुरुनानक देव यांच्या ५५० व्या प्रकाशपर्वाबद्दलही मुद्दे मांडण्यात आले आहेत.

सरस्वती शिशु मंदिर केदारधाममध्ये आठ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत शबरीमला मंदिर प्रश्नी प्रस्ताव पारित करण्यात आला. यावेळी रा.स्व.संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी म्हणाले कि,
अ-भारतीय, अ-हिंदू विचारांशी जोडलेले लोक वारंवार हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेवर आघात करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एका षडयंत्रासारखे सुरू आहे. शबरीमला मंदीर प्रवेशाचा मुद्दा हे याचेच एक उदाहरण आहे.


हिंदू धर्मीयांच्या विरोधात क्षुल्लक राजकारणासाठी वैचारीक युद्ध सुरू केले आहे. केरळची मार्क्सवादी सरकार अय्यप्पाच्या भक्तांचा मानसिक स्वरूपात छळ सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. नास्तिक महिला संघटना कार्यकर्त्यांनी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश करत भक्तांच्या भावाना भडकवण्याचे काम करत असल्याचेही सहकार्यवाह जोशी यावेळी म्हणाले.



परंपरा आणि मान्यता आणि चालीरीतींवर आघात

जलीकट्टू, दीपावली, शबरीमला मंदिर आणि अन्य हिंदू परंपरांवर देण्यात आलेल्या न्यायालयीन निर्णयावर भाष्य न करता समाज हा संविधानासह परंपरा, स्मृती, चालीरीती आणि मान्यतांवरही चालतो, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. न्यायालयाने अशा प्रकरणांवर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे, मात्र, परंपरा या तोडग्यातूनच निर्माण झालेल्या असतात, अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.

पर्यावरण संरक्षणासाठी रा. स्व. संघ करणार कार्य

भैय्याजी जोशी यांनी प्रतिनिधी बैठकीत रा.स्व.संघ आता व्यापक स्वरूपात पर्यावरण संरक्षणासाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. प्लास्टिक, थर्माकोल मुक्त वातावरण, वृक्षारोपण आदी कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@