सुप्रजा भाग-७
महा एमटीबी   11-Mar-2019


 


प्रथम तीन महिन्यांमध्ये गर्भाची वाढ झपाट्याने होत असते. त्याला समावून घेण्यासाठी स्त्रीगर्भाचा आकारही तेवढ्याच गतीने वाढत जातो. गर्भाशयात केवळ गर्भच नाही, तर अंबुजल (amniotic fluid) आणि वार (placenta) ही असतो. त्यात ही वाढ होत जाते. त्यामुळे, गर्भाच्या सहाव्या आठवड्याला गर्भाशयाचा आकारही कोंबडीच्या अंड्याइतका होतो. आठव्या आठवड्यात हा आकार वाढून क्रिकेटच्या बॉलइतका होतो आणि बाराव्या आठवड्यापर्यंत गर्भाशयाचा आकार गर्भाच्या डोक्याइतका होतो.

 

आयुर्वेदशास्त्रात गर्भ राहिल्यापासून त्याची संपूर्ण वाढ कशी होते, कुठल्या टप्प्यात होते हे विस्तृतपणे सांगितले आहे. प्रत्येक महिन्यात गर्भाची वाढ होत असते, पण काही विशिष्ट अंग, अवयव विशिष्ट महिन्यात अधिक वाढतात. याबाबत सविस्तर माहिती आधीच्या लेखांमधून आपण घेतली. या प्रत्येक महिन्यात स्त्रीशरीरात विशिष्ट बदल घडत असतात. हे गर्भावस्थेचे नऊ महिने तीन भागांमध्ये विभागले जातात. (- महिन्यांचा एक गट - Trimesters) First Trimester, Second Trimester आणि Third Trimester. स्त्रीशरीर विविध पद्धतीने गर्भातील बदल सामावून घेण्यासाठी बदलत असते, तयार होत असते. त्याबद्दल आजच्या लेखामधून जाणून घेऊया.

गर्भाची पहिल्या तीन महिन्यातील वाढ (First Trimester) ही विविध अंग-प्रत्यंग निर्मिती विभाजन या स्वरूपाची असते. दुसर्‍या तीन महिन्यावरील वाढ (Second Trimester) ही त्या त्या अवयवांची संपूर्ण वाढ आणि विविध संस्थांची संपूर्ण निर्मिती वाढ प्रक्रिया या पद्धतीची असते. या काळात नवीन उत्पत्ती कमी, पण जी उत्पत्ती झाली आहे त्यात विविध क्रियाशीलता आणि पूर्णत्व येत जाते. प्रत्येक अंग-अवयव, संस्था (different systems) परिपूर्ण होऊ लागतात. त्यांनी क्रियाशीलता उत्पन्न होते प्रसुतीनंतर सर्व संस्था उत्तमरित्या कार्य करू शकतात. ही क्षमता त्यात येऊ लागते. शेवटच्या तीन महिन्यात (Third Trimester) गर्भाची सर्वांगिण वाढ होत असते.

जशी रेडिओवर एखादी वाहिनी लागते, पण 'Fine Tuning' केल्यावर उत्तम ऐकू येते, त्याचप्रमाणे सहाव्या महिन्यापर्यंत वाढ होते, पण 'Fine Tuning' पुढील तीन, म्हणजेच शेवटच्या तीन महिन्यांत होते. स्त्रीशरीरात गर्भ सुरक्षित वातावरणामध्ये असतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी, उकाडा तसेच अन्य प्रदूषणे आहारीय बदल यांचा थेट संपर्क गर्भात असेपर्यंत येत नाही. त्या सर्व बदलांना जन्मताक्षणी सामोरे जावे लागते आणि याची तयारी या Third Trimester मध्ये केली जाते. याप्रमाणे स्त्रीशरीरातील बदल प्रामुख्याने दोन प्रकारचे होतात. शारीरिक बदल (यात अंत:स्त्रावातील बदलही येतात) आणि भावनिक-मानसिक बदल. गर्भिणी अवस्थेतील सुरुवातीच्या टप्प्यात अंत:स्त्रावाच्या पातळीमध्ये बदल होतात. (Hormonal Changes) तसेच गर्भाबरोबरच वार (placenta) आणि गर्भाशय यातील वाढीसाठीही ऊर्जा अधिक लागते. आहारातूनच ही ऊर्जा मिळते आणि गर्भिणी अवस्थेतील पुढच्या टप्प्यामध्ये गर्भाच्या वाढीमुळे, गर्भाशय वृद्धीमुळे पोटातील अन्य अवयवांवर दाब येतो आणि त्यांच्या नियमित कार्यात बदल होतो.

गर्भिणीतील टप्प्यातील बदल खालीलप्रमाणे आहेत

. First Trimister (पहिले तीन महिने) यामध्ये स्त्रीशरीरामध्ये होणारा सर्वात पहिला बदल म्हणजे मासिक रजस्त्राव (menses) थांबतात. बहुतांशी महिलांमध्येपाळी चुकलीकी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करण्याची पद्धत आहे. मासिकस्त्राव थांबण्याचे कारण विशिष्ट अंत:स्त्रावी ग्रंथीच्या स्त्रावांमध्ये होणारी वाढ. जसे 'Destrogen' आणि 'Progesterone.' सुरुवातीच्या दिवसांमध्ये, जेव्हा गर्भाच्या आकाराला मनुष्य स्वरूप नसते, त्या वेळेस विशेषत: स्त्रीशरीरासाठीते पेशी(foreign body) समान असतात आणि शरीराच्या पहिली प्रतिक्रिया अशी असते की, या (foreign body) ला शरीराबाहेर काढण्याची प्रवृत्ती होय. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांमध्ये विशेषत: पहिल्या बारा आठवड्यांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.

याचदरम्यान मळमळणे, तोंडाला चव नसणे, अन्नाची इच्छा होणे, उलट्या होणे . तक्रारी अधिक असतात. विशिष्ट वास आल्यावर, जो आधी आवडायचा/त्रास व्हायचा नाही, त्या वासांनी मळमळ वाढणे, उमासे येणे असे होऊ शकते. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी की, प्रत्येक गर्भिणीमध्ये मळमळ, उलटी, जेवणाची इच्छा होणे . लक्षणे उत्पन्न होत नाहीत. काहींमध्ये तीव्र स्वरुपाचीठशरलींळेपउत्पन्न होते, तर काहींमध्ये काहीच फरक जाणवत नाही. यातीलहेबरोबर आणितेचूक असे काही नसते. प्रत्येक शरीर भिन्न असते, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. तसेच प्रत्येक वेळेचीगर्भप्रवृत्तिही वेग-वेगळी असते म्हणजे पहिल्या खेपेला त्रास झाला आणि दुसर्‍या खेपेस तीव्र उलट्या-उमासे होऊ लागले, तर यात काही चुकीचे नाही. तेव्हा मैत्रिणीला किंवा बहिणीला .ला त्रास होतो, मलाच होत नाही. सगळे नीट तर आहे ना? असा प्रश्न कधी मनात येऊ नये. शरीराची प्रतिक्रिया (reaction) देण्याची पद्धत प्रत्येकीमध्ये आणि प्रत्येक वेळी वेगळी असते. ते बदल स्वीकारावेत.

प्रथम तीन महिन्यांमध्ये गर्भाची वाढ झपाट्याने होत असते. त्याला समावून घेण्यासाठी स्त्रीगर्भाचा आकारही तेवढ्याच गतीने वाढत जातो. गर्भाशयात केवळ गर्भच नाही, तर अंबुजल (amniotic fluid) आणि वार (placenta) ही असतो. त्यात ही वाढ होत जाते. त्यामुळे, गर्भाच्या सहाव्या आठवड्याला गर्भाशयाचा आकारही कोंबडीच्या अंड्याइतका होतो. आठव्या आठवड्यात हा आकार वाढून क्रिकेटच्या बॉलइतका होतो आणि बाराव्या आठवड्यापर्यंत गर्भाशयाचा आकार गर्भाच्या डोक्याइतका होतो. गर्भाशयाचे स्नायू अत्यंत लवचिक असतात. त्यांची आकुंचन-प्रसरण क्षमता उत्तम असते. गर्भिणी अवस्थेपूर्वी गर्भाशयाचा आकार आपल्या बंद मुठी इतकाच असतो. तसेच अगर्भिणी अवस्थेत गर्भाशयाचा वरील भाग गोलाकार आणि खालील भाग निमुळता असतो. या आकाराला 'pyriform shape' म्हणतात. बल्बच्या आकारसदृश्य गर्भाशयाचा आकार असतो. गर्भ राहिल्यावर त्याचा आकार वाढतो आणि बदलतोही. (shape changes, size increases) गर्भ असतेवेळी गर्भाशयाचा आकार अधिक वर्तुळाकार होतो. गर्भावस्थेत गर्भिणीचे गर्भाशय अधिक लुसलुशीत आणि लवचिक होते (Soft and Elastic). या आकारातील बदलामुळे गर्भाच्या आठव्या ते बाराव्या आठड्यामध्ये गर्भाशयाचा गोलाकार भाग, जो भरीव झालेला असतो (placenta गर्भामुळे) त्याचे वजन urinary bladder वर पडते. अन्य बदलांमुळे लघवीला थोडे थोडे आणि वारंवार होते. शेवटच्या Trimesterमध्येदेखील गर्भवृद्धीमुळे हीच लक्षणे उत्पन्न होतात.
 

बदललेल्या संप्रेरकांमुळे स्तनांमध्ये बदल घडून येतो. स्तनांमध्ये थोडा भरीवपणा, आकारात वृद्धी आणि स्फुरण जाणवते. ही लक्षणे सहाव्या ते आठव्या आठवड्यात जाणवतात. पण, प्रत्येक गर्भिणीला ती समजतीलच असे नाही. हे बदल थोडे थोडे हलके, हळू-हळू होत असतात. काहींना हे बदल जाणवतात काहींना नाही. यातही बरोबर की चूक असे काही नसते. अनवधानाने जर गर्भ राहिला, तर हे बदल चटकन लक्षात येत नाही. planned pregnancy sensitive formula असल्यास हे बदल जाणवतात, प्रकर्षाने कळतात.

 

गर्भिणी अवस्थेच्या पूर्व काळात early pregnancy) स्त्रीला खूप दमल्यासारखे, गळून गेल्यासारखे वाटते. शरीरातील ऊर्जेची गरज एकदम वाढल्यामुळे थकून जाणे हे वारंवार होते. सकाळी ताजेतवाने वाटणे, झोपून राहावेसे वाटणे, अशीही लक्षणे पहिल्या तीन महिन्यांमध्ये उद्भवतात. या व्यतिरिक्त अन्य जी लक्षणे गर्भिणीत उत्पन्न होतात, ती पुढील लेखात बघू.

 

(क्रमश:)

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat