महागठबंधन नव्हे हे ही तर महामिलावट : नरेंद्र मोदी
महा एमटीबी   08-Feb-2019


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपविरोधात महागठबंधन बनवणाऱ्या विरोधकांवर जोरदार प्रहार करत हे महागठबंधन महामिलावट असल्याचे म्हणत मतदारांनी त्यांच्यापासून सावध राहावे, असे म्हटले. शुक्रवारी टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी चांगला समाचार घेतला.

 

ते म्हणाले, “विविध विचारधारेचे पक्ष भाजपविरोधात एकजूट येऊन मोट बांधत आहेत. या महामिलावटीविरोधात चौकीदार शांत बसणार नाही. कॉंग्रेसचे सर्व नेते हे कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आहेत. अशा लोकप्रतिनिधींपासून सावध राहायला हवे.छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील कोडातराई येथील एका रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते.

 

मोदी म्हणाले, “गांधी परिवाराशी संबंधित बहुतांश व्यक्ती जामिनावर बाहेर आहेत. मी एका नव्या भारतासाठी तुमच्याकडे एक जनादेश मागण्यासाठी आलो आहे. मोदी सरकारच्या अंतर्गत घेतलेल्या विविध योजनांमधून गरीबी कमी होऊ लागली आहे.

 

रायपूर ते दिल्लीपर्यंत कॉंग्रेसचे सरकार दलालांना हाताशी धरून एका तंत्रावर चालत आले आहे. कॉंग्रेस आयुषमान योजनेला विरोध करत अशी योजना लागू करू इच्छित आहे, जिथे केवळ भ्रष्टाचार शक्य आहे, असा आरोप त्यांनी केला. छत्तीसगडमध्ये आदिवासांनी इलाजासाठी आपल्या जमिनी विकाव्या लागल्या आहेत.

 

छत्तीसगडला भ्रष्टाचाराचे एटीएम बनवतेय कॉंग्रेस

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉंग्रेसवर हल्लाबोल करताना म्हणाले कि, “कॉंग्रेसने भ्रष्टाचाराचा एकही मार्ग सोडलेला नाही. सीबीआयच्या कारवाईतही हस्तक्षेप करत आहेत. भ्रष्टाचार रोखू पाहणाऱ्या सीबीआयच्या मार्गातही आडकाठी घालण्याचा प्रयत्न कॉंग्रसने केला. छत्तीसगडला आगामी लोकसभा निवडणूकांसाठी एटीएमसारखे वापर करण्याचा कॉंग्रेसचा विचार आहे. मात्र, सीबीआय हा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/