ममता दिदी !!! चिट फंड घोटाळ्याला इतक्या का घाबरता : नरेंद्र मोदी
महा एमटीबी   08-Feb-2019
 

कोलकाता : तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांचा बालेकिल्ला कोलकता येथे जाऊन नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. कोलकाता स्थित जलपाईगुडीतील अनेक विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर सभेला संबोधित करताना, चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीला ममता एवढ्या का घाबरत आहेत, असा सवाल मोदींनी उपस्थित केला आहे.


मोदी म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री हजारो गरीब लोकांना लूटणाऱ्यांच्या बाजूने धरणे आंदोलन करतो, असे चित्र देशाच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच पाहायला मिळाले. दीदी, दिल्लीला जाण्यासाठी अस्वस्थ आहेत. मी विश्वास दोतो, की चिटफंड घोटाळ्यात गरिबांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या प्रत्येकाला, मी कायद्याच्या दरात ओढेल.

 

त्तापर्यंत पश्चिम बंगालच्या गुंडांशी दोन हात करायला कुणीही तयार नव्हते. मात्र, आता आपल्यासोबत भाजप आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. पश्चिम बंगालमध्ये अनेक दशकांपासून हिंसाचाराच्या घटना सुरू आहेत. आता, अशा घटना थांबायला हव्यात. बंगालमधील युवकांना रक्तपातापासून मुक्तता मिळायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/