भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
महा एमटीबी   08-Feb-2019ऑकलँड : येथील एडन पार्क मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने बाजी मारली. न्यूझीलंडने दिलेले १५९ धावांचे लक्ष भारतीय संघाने सात गाडी राखून पार केले. तीन सामान्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी साधली.

 

न्यूझीलंडने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने २९ चेंडूत ५० धावा फाटकावल्या. सलामीला आलेले रोहित शर्मा व शिखर धवनने पहिल्या गड्यासाठी ७९ धावांची भागीदारी रचली. शिखर धवनने ३० व रिषभ पंतने ४० धावा फटकावल्या.

 

तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कॉलिन डी ग्रॅंडहोमच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५८ धावा केल्या. तर भारताकडून कृणाल पांड्याने ३, खलील अहमदने २ आणि भुवनेश्वर व हार्दिक पांड्याने १-१ गडी टिपला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/