गरुड महाविद्यालयात राज्यस्तरीय आय.क्यू.ए.सी.नॅक कार्यशाळा
महा एमटीबी   07-Feb-2019
 

 
शेंदुर्णी. 6 फेब्रुवारी
गरुड महाविद्यालयात राज्यस्तरीय आय.क्यू. ए.सी. व नॅक पुनर्मूल्यांकन कार्यशाळा विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांच्या सहभागात उत्साहात पार पडली.
 
 
कार्यशाळेचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा.एन.एस.पवार शिंदखेडा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय गरुड होते. आय. क्यू. ए.सी. क्लस्टरची कार्यपद्धती, नॅकसाठी आय.आय.क्यू, ए. व एस.एस.आर.ची मांडणी, स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हेत येणार्‍या अडचणी व उपाययोजना, विद्यार्थ्यांमध्ये ई-मेल आय.डी. वापरासंबंधी जाणीवजागृती करणे आवश्यक ठरते, असे सांगण्यात आले. डी.व्ही.बी.त.डाटा टेम्प्लेटची उलटतपासणी यात गुणांक मिळविणे गरजेचे ठरते. विद्यार्थीपूरक उपक्रमांची माहिती संकलनाची कार्यपद्धती महत्त्वाची ठरते. रिसर्च पेपर, यूजीसी लिस्टेड जर्नल्समध्ये प्रकाशित करणे गरजेचे का ठरते? याचे महत्त्व उद्घाटकीय भाषणातून प्रा. पवार यांनी स्पष्ट केले.
 
 
व्हुच्युल लेक्चर्स, ग्रंथालयाचे महत्त्व हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. देशात 1800 महाविद्यालयांनी आजपावेतो नॅक केलेले नाही. त्यापेक्षा आपण तृतीय चक्रात असणार्‍या महाविद्यालयातील प्रतिनिधी भाग्यवान असल्याचे डॉ. भारत शिंदे, बारामती यांनी स्पष्ट केले.प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक डॉ. दिनेश पाटील यांनी केले तर प्राचार्य डॉ. वासुदेव आर. पाटील यांनी कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. योगिता चौधरी, प्रा. भूषण पाटील तर आभार प्रा. अमर जावळे यांनी मानले .
 
 
याप्रसंगी सिनेट सदस्य डॉ. अनिल पाटील, डॉ. संध्या सोनवणे, प्राचार्य डॉ. ए.पी.दलाल, उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे, उपप्राचार्य प्रा.आर.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. शाम साळुंखे, महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीचे सदस्य रवींद्र गुजर, प्रा.पी.जे.सोनवणे, प्रा. ए.एस. महाजन, प्रा.एस.जी.डेहरकर, डॉ.आर.डी.गवारे, डॉ. सुजाता पाटील, डॉ.ए.एन.जिवरग, डॉ. शरद पाटील, डॉ.व्ही.एन.पतंगे तसेच प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.डॉ. भारत शिंदे, बारामती यांनी पाहिल्या सत्रात,दुसर्‍या सत्रात डॉ. निर्मला पद्मावत यांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे उपस्थित होते. एकदिवसीय कार्यशाळेची फलिते त्यांनी अध्यक्षीय समारोपातून विषद केली.