‘रॉकी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
महा एमटीबी   07-Feb-2019

 

 
 
 
मुंबई : ‘रॉकी’ सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रॉकी’ सिनेमाच्या निमित्ताने एक चांगला अॅक्शनपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘रॉकी’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत कोण आहे? याची अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता होती. पिळदार शरीरयष्टी असलेला हा अभिनेता कोण? यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मनोरंजन विश्वात याविषयी चर्चा रंगत होती. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नवोदित अभिनेता संदीप साळवे या सिनेमातून पदार्पण करत आहे.
 
 
 
 

“‘रॉकी’ हा सिनेमा अॅक्शनपट असल्याने मराठी सिनेसृष्टीतील माझे पदार्पण दमदार होणार आहे. यापेक्षा दुसरी कोणतीच आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही. असे संदीपने म्हटले. हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता राहुल देव ‘रॉकी’ या सिनेमामध्ये खलनायक साकारला आहे. ‘रॉकी’च्या निमित्ताने राहुल देव यांनी पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम केले आहे. ‘रॉकी’ या सिनेमात नायिका म्हणून नवोदित अभिनेत्री अक्षया हिंदोळकर प्रेक्षकांसमोर येणार आहे. अक्षयाचादेखील हा पदार्पणातील सिनेमा आहे. अशोक शिंदे, यतीन कार्येकर, प्रदीप वेलणकर, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, गणेश यादव, दीप्ती भागवत, स्वप्नील राजशेखर या कलाकारांच्यादेखील ‘रॉकी’ सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत. येत्या ८ मार्च रोजी ‘रॉकी’ हा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/