विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा समोर येणार!
महा एमटीबी   06-Feb-2019

 

 
 
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही लोकप्रिय मालिका आता एक नवीन वळण घेणार आहे. मालिकेतील विक्रांत सरंजामेचे खरे रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. झी मराठी वाहिनीने त्यांच्या ट्विटरवर मालिकेत पुढे घडणाऱ्या घटनांचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमधील व्हिडिओमध्ये विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा समोर आल्याचे दाखवले आहे.
 
 
 
 

विक्रांत सरंजामेची पाठराखण करणारा, सतत त्याच्यासोबत असणारा झेंडे विक्रांतच्या कानाखाली वाजवतो. विक्रांत सरंजामेने इशा निमकरशी लग्न करण्यामागचे खरे कारण वेगळे असून त्याची कबुली विक्रांत सरंजामे स्वत: या प्रोमोमध्ये देताना दिसतो. विक्रांतचा शत्रू जालंदर यापूर्वी इशाला म्हणाल्याप्रमाणे ‘विक्रांत आणि विश्वासघात यांची एकच जात आहे’. हे खरे ठरणार का? चांगूलपणाच्या पडद्याआड विक्रांत सरंजामेचा लपलेला खरा चेहरा प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/