काश्मिर संमेलनात भारतीय माध्यमांचा प्रवेश नाकारला
महा एमटीबी   06-Feb-2019
 

लंडन : इंग्लंडमधील 'हाऊस ऑफ कॉमन्स' परिसरात सोमवार, दि. फेब्रुवारीला आयोजित केलेल्या एका वैश्विक संमेलनात भारतीय माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला. काश्मिर प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे.

 

पाव्याप्त काश्मिरात जन्मलेले कंझरव्हेटिव्ह खासदार रहमान चिश्ती हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महेमूद कुरैशी यांनी संबोधित केले. यावेळी पाकिस्तानी मूळ असलेले ब्रिटीश खासदार आणि त्यांचे सहकारीही उपस्थित होते. हा एक खुला कार्यक्रम असल्याचे बोलले जात असताना भारतीय प्रसिद्धी माध्यमांची अशी अडवणूक झाल्याने सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

 

यासंदर्भात बोलताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय पत्रकारांना संमेलनात प्रवेश करू दिल्याने भारताने निषेध व्यक्त केला आहे. आपण हे प्रकरण अत्यंत गांभिर्याने घेतले असून. ब्रिटीश सरकार आपल्या आक्षेपांवर विचार करून आवश्यक ती कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/