दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण योजनेंतर्गत
महा एमटीबी   06-Feb-2019
धुळे जिल्ह्यात आजपासून रोजगार मेळावे

धुळे :
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात ६ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.


जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, धुळे यांच्यातर्फे ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील बेरोजगार युवक/युवतींना तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणाद्वारे खासगी कंपनीत नोकरीची हमी देणारी ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक- युवतींना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार ६ रोजी , वाघाडी (अल्पसंख्याक), शिरपूर. ७ रोजी, दहिवेल (अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक), साक्री ८ रोजी, नरडाणा (अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक), शिंदखेडा. ९ रोजी, विश्वनाथ, धुळे. ११ फेब्रुवारी, निमडाळे (अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक), धुळे. १२ फेब्रुवारी, चिमठाणे, शिंदखेडा. १३ फेब्रुवारी, कुडाशी (अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक), साक्री. १४ फेब्रुवारी, थाळनेर (अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक), शिरपूर. १५ फेब्रुवारी, बेटावद, शिंदखेडा.
रोजगार मेळावे संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत होतील.