वरुण आणि श्रद्धा बनणार ‘स्ट्रीट डान्सर’
महा एमटीबी   05-Feb-2019

 

 
 
 
मुंबई : ‘ABCD’ आणि ‘ABCD2’ या डान्सवर आधारित दोन सुरहिट सिनेमांनंतर कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमो डिसूझा आता या सिनेमाच्या सिरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘स्ट्रीट डान्सर’ असे या सिनेमाचे नाव असून नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहे.
 
 
 
 

एका रिअॅलिटी शोमध्ये रेमो डिसूझाने ‘स्ट्रीट डान्सर’ या सिनेमाची घोषणा केली होती. अभिनेता वरुण धवन या सिनेमात एका पंजाबी तरुणाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही एका पाकिस्तानी डान्सरची भूमिका साकारत आहे. भूमिकेसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर खूप मेहनत घेत आहे. प्रशांत शिंदे आणि तानियाकडून श्रद्धा ५ वेगवेगळे नृत्यप्रकार शिकत आहे. यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी स्ट्रीट डान्सर’ हा सिनेमा थ्रीडी स्वरुपात प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/