सावदा येथे स्वाईन फ्लूने एकाचा मृत्य
महा एमटीबी   05-Feb-2019
उपाय योजना करण्याची मागणी

सावदा, ५ फेब्रुवारी
शहरातील रुबीना शेख गुलाम वय ३५ या महिलेचा ३ रोजी स्वाईनफ्लूने मृत्यू झाल आहे. मयत रुबीना हीच्या १० वर्षीय मुलीला सुध्दा स्वाईनफ्लूची लागण झाली असून तीच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उचार सुरु आहेत.


शहरात स्वाईनफ्लूचा प्रभाव वाढून अनेकांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पालिकेने वेळीस दक्षता घेवून जनजागृती व उपाययोजना करावी. अशी मागणी नगरसेवक राजेश वानखेडे, फिरोजखान पठान यांनी केली असून तसे पत्र मुख्याधिकारी सावदा नगर पालिका व जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले आहे.