पत्रकार फाऊंडेशनला २० खुर्च्या भेट
महा एमटीबी   05-Feb-2019

फैजपूर:
फैजपूर पत्रकार फाऊंडेशन संचलित फैजपूर शहर पत्रकार संघाचा विद्यानगर येथील कार्यालयामध्ये छोटे खानी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. पत्रकार फाऊंडेशन कडून लवकर शहरात समाजपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले. नव्यानेच सर्वानुमते स्थापन झालेल्या पत्रकार फाऊंडेशन साठी डॉ. कुंदन फेगडे (यावल नगरसेवक) यांच्याकडून २० खुर्च्या भेट देण्यात आल्या. त्यांचा सर्व पत्रकारांनी गौरव केला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, उपाध्यक्ष राजू तडवी, सचिव प्रा. उमाकांत पाटील, खजिनदार अरुण होले, सहसचिव सलीम पिंजारी, सदस्य प्रा. राजेंद्र तायडे, संजय सराफ, निलेश पाटील, मयूर मेढे, इदू पिंजारी, शाकिर मलिक, कामील शेख, जावेद काझी, समाजसेवक गोटू भारंबे, मातोश्री फाउंडेशन पिंपरुड चे उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले उपस्थित होते.