सावदा क्रबस्थानसाठी ६० लाख निधी मंजूर
महा एमटीबी   05-Feb-2019

सावदा, ५ फेब्रुवारी
नगर पालिकेला वैशिष्ट्यपुर्ण योजना विशेष अनुदानांतर्गत कब्रस्थान विकासाकरिता ६० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तसे पत्र मिळाल्याची माहिती नगराध्यक्षा अनिता येवले यांनी दिली आहे.


खा.रक्षाताई खडसे, माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मंत्रालयात प्रधान सचिव नगरविकास विभाग यांच्या सोबत सावदा, बोदवड, मुक्ताईनगर येथील मुख्याधिकार्‍यांची विशेष बैठक आयोजित केली होती. आ. एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने सावद्यातील कब्रस्थान विकासासाठी ६० लाख रुपये, बोदवड शहरातील कब्रस्थानासाठी ४० लाख रुपये मंजूर झाल्याचा शासन निर्णय प्राप्त झाल्याचे नगराध्यक्षा अनिता येवले यांनी सांगितले आहे.