टेनिसचा सुपरस्टार फेडरर टॉप ५ मधून बाहेर
महा एमटीबी   04-Feb-2019


 

 

नवी दिल्ली - टेनिसचा सुपरस्टार आणि स्वित्झर्लंडचा माजी अग्रमानांकित खेळाडू रॉजर फेडरर टेनिसच्या एटीपी मानांकनच्या टॉप फाईव्हमधून बाहेर गेला आहे. फेडरर सध्या एटीपी मानांकनात सहाव्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच पहिल्या स्थानावर कायम आहे.

 

रॉजर फेडरर विम्बल्डन २०१८ च्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामन्यात आफ्रिकेच्या कोरी अँडरसनकडून पराभूत झाला होता. त्यानंतर अमेरिकन ओपनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या निकी किरगीसकडून फेडरर पराभूत झाला होता. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बिगर मानांकित ग्रीसच्या २० वर्षीय स्टेफोनस त्सित्सिपासकडून पराभूत झाला होता. फेडरर सलग तीनही ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीपूर्वी बाहेर पडला आहे.

 

सर्बियाचा नोवाक जोकोविच १० हजार ९५५ अंकासह पहिल्या स्थानावर विरजमान आहे तर स्पेनचा राफेल नदाल ८ हजार ३२० अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी जर्मनीचा अलेक्झांडर झुवारेव आहे. त्याच्या नावावर ६ हजार ४७५ गुण आहेत. ५ हजार ६० अंकासह चौथ्यास्थानी अर्जेटिनाचा नुआना मार्टीन डेल पोट्रो आहे. पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा कोरी अँडरसन ४ हजार ८४५ गुण आहेत. रॉजर फेडरर ४ हजार ६०० गुण आहेत. तो सहाव्या स्थानी फेकला गेला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/