विक्रीनंतरही सेन्सेक्स ११३ अंशांनी उसळला
महा एमटीबी   04-Feb-2019


 

मुंबई : अनिल अंबानींच्या मालकीत्वाची रिलायन्स ग्रुप कंपन्यांमध्ये दिवसभर सुरू असलेल्या विक्रीच्या सपाट्यानंतरही भारतीय शेअर बाजार वधारत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११३ अंशांच्या तेजीसह ३६ हजार ५८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १९ अंकांनी वधारत १० हजार ९०० हा आकडा पार करून १० हजार ९१२ अंशांवर बंद झाला.

 

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकावर एनर्जी, खासगी बॅंका, गृहउपयोगी वस्तू, तेल आणि वायू, आयटी आदी क्षेत्रातील शेअर वधारले. निफ्टीच्या मंचावर सार्वजनिक बॅंका, खासगी बॅंका, वित्तीय सेवा आणि आयटी क्षेत्रातील शेअर वगळता सर्वत्र घसरण झाली.

 

अनिल अंबानींच्या मालकीत्वातील कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेली विक्री पाहता मुकेश अंबानींसाठी आजचा दिवस फायद्याचा ठरला. त्यांचे मालकीत्व असलेल्या रिलायन्सचा शेअर ३.४६ टक्क्यांनी वधारला. या तेजीत आठ लाख कोटींचे बाजारमुल्य असलेली भारतातील पहिली कंपनी बनली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/