रूपलाल महाराजांना राष्ट्रसंतांचा दर्जा प्राप्त होईल
महा एमटीबी   04-Feb-2019

बारी समाजाच्या महाअधिवेशनात आ.एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन


 
 

जळगाव, ३ फेब्रुवारी
 
बारी समाजातील संत रूपलाल महाराज यांना राष्ट्रसंताचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी दिले.
 
 
शिरसोली रोडवर झालेल्या बारी समाजाच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रामदास बोडखे हे होते. व्यासपीठावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, भुसावळचे आ. संजय सावकारे, शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजया खलसे, जळगाव जामोदच्या नगराध्यक्षा सीमा डोबे, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, सोयगावच्या नगराध्यक्षा प्रतिभा बोडखे, भोपाळच्या ग्रामभारती शिक्षण समितीचे माजी उपाध्यक्ष भगिरथ कुमावत, दिल्लीचे रमेश चौरसिया, उत्तर प्रदेशचे अनुपकुमार, बिहारचे राज मोदी, नगरसेविका शोभा बारी, माजी पं.स.सदस्या लता बारी, माजी आयुक्त प्रकाश बोखडे, समाधान रामधर, शिरसोलीच्या आशा आंबटकर, देवराम बारी, पुंडलिक बारी, प्रा.नितीन बारी, जि.प.कृषी अधिकारी जीवन बुंदे, माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, उद्योजक राजेंद्र फुसे, विनायक बारी आदी मान्यवर होते.
 
 
प्रास्ताविक कार्याध्यक्ष मनोज बारी यांनी केले. आभार पुंडलिक बारी यांनी मानले. सूत्रसंचालन संजय बारी, रतन थोरात यांनी केले.बारी समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र आले तरच दबाव गट निर्माण होईल. दरवर्षी महासंमेलन घेणे आवश्यक असल्याचे रामदास बोडसे यांनी सांगितले. संत रूपलाल महाराज यांना राष्ट्रीय संताचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रशासनाकडे मागणी करणार असल्याचे डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले. बारी समाजाचे विविध प्रश्‍न शासन दरबारी मांडत असतो. यापुढेही मांडत राहील, अशी ग्वाही गुलाबराव देवकर यांनी दिली.या महाअधिवेशनात उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली येथून सुमारे तीस हजार समाजबांधव उपस्थित होते.