पूजा सावंत ‘या’ सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!
महा एमटीबी   04-Feb-2019

 

 
 
 
 
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता विद्युत जामवालच्या ‘जंगली’ या सिनेमात पूजा सावंत झळकणार आहे. वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्याच्या संघर्षावर आधरित ‘जंगली’ हा सिनेमा आहे.
 
 
 
 

हत्तींची शिकार होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याविरोधात एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्याने केलेला संघर्ष या सिनेमातून दाखविण्यात येणार आहे. अभिनेत्री पूजा सावंतने या सिनेमात महत्वाची भूमिका साकारली आहे. जंगली पिक्चर्स निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन चक रसेल यांनी केले आहे. येत्या ५ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/