सर्जिकल स्ट्राईक २ : देशभरात high josh!
महा एमटीबी   26-Feb-2019

 

 
 
 
 
मुंबई : मंगळवारी सकाळी भारतीय वायुसेनेने पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली. भारतीय वायुसेनेच्या ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. भारतीय वायूसेनेने हजार किलोचा बॉम्ब फेकून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ नेस्तनाबूत केले. भारताने केलेल्या या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून भारतीय वायुसेनेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशातील सर्व स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 
 

क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने “The boys have played really well” असे म्हणत भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले. “सुधर जाओ वरना, सुधार देंगे” असा हॅशटॅग ट्विट करून सेहवागने पाकिस्तानला इशारा दिला.

 
 
 

अभिनेता अजय देवगणने ट्विट करून भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीला सलाम केला. आमच्याशी पंगा घ्याल तर अशीच हालत होईल अशा आशयाचे ट्विट अजय देवगणने केले आहे.

 
 
 

बॉलिवुडचा खिलाडीकुमार अक्षय कुमारने मला भारतीय वायुसेनेचा अभिमान आहे. आत घुसून मारा. आता शांत बसायचे नाही”. असे अक्षय कुमारने म्हटले आहे.

 
 
 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजवर अशी मानवंदना कधीच दिली गेली नसेल. अशी मानवंदना आज आपल्या भारतीय वायुसेनेने दिली आहे. अशी प्रतिक्रिया अभिनेते योगेश सोमण यांनी दिली. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमात तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भूमिका त्यांनी साकारली होती.

 
 
 

“आजची सकाळ ही खऱ्या अर्थाने चांगली झाली.” असे म्हणत अभिनेते परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. भारतीय वायुसेनेच्या वीरांना ‘जय हो’ म्हणत त्यांचे कौतुक केले.

 
 
 

अभिनेता अभिषेक बच्चनने भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीला नमस्कार केला.

 
 
 

नवी दिशा, नवी दशा, नवी रिती, नवी नीती, नव्या भारताला आणि खऱ्या भारताच्या वीरपुत्रांना मी शतश: नमन करतो. असे गायक कैलाश खेर यांनी ट्विट करत भारतीय वायुसेनेला मानवंदना दिली. तसेच एक भारत श्रेष्ठ भारत असा हॅशटॅग त्यांनी ट्विट केला.

 
 
 

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ब्रॅवो इंडिया’ असे म्हणत भारतीय वायुसेनेचे कौतुक केले.

 
 
 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने जय हिंद म्हणत टिविट केले.

 
 
 

परदेशात स्थित असलेली बॉलिवुड अभिनेत्री सेलिना जेटलीने देशप्रेम व्यक्त केले. “याद रहे नाम, नमक और निशान” असे सेलिनाने ट्विट केले आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat