भाजपकडून सावरकरांचा वैचारिक पाया पुढे नेण्याचे कार्य सुरु : केशव उपाध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2019
Total Views |
 
 

मुंबई : स्वातंत्र्यापासून इथल्या सत्ताधाऱ्यांनी, विचारवंतांनी व कम्युनिस्टांनी स्वा. सावरकरांना सातत्याने डावण्याचे काम केले. संपूर्ण सावरकर हे संघ, जनसंघ वा भाजप असो, कोणालाही पचवणे अवघड आहे. मात्र, सावरकरांचा वैचारिक पाया पुढे नेण्याचे कार्यभाजपकडूनच सुरु आहे, असे ठोस प्रतिपादन भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५३ व्या आत्मार्पण दिनानिमित्त सोमवार दि. २५ फेब्रुवारी रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातआयोजित करण्यात आलेल्या हिंदुत्व, बुद्धीप्रामाण्य आणि सावरकर या परिसंवादात ते बोलत होते. परिसंवादात केशव उपाध्ये यांच्याबरोबरचनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक व शास्त्रज्ञ डाॅ बाळ फोंडके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचेकार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि ज्येष्ठ पत्रकार व लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचाही सहभाग होता. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याआत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दि. २५, २६ व २७ फेब्रुवारी अशा दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजनकरण्यात आलेले आहे, त्यातल्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आज पार पडला.

 

परिसंवादात स्वा. सावरकरांच्या हिंदुत्व, श्रद्धा व अंधश्रद्धा, गोपूजन व गोपालन, दैवी चमत्कार-बुवाबाजी, छद्मविज्ञान, पुराणांतील प्लास्टिकसर्जरी, स्टेम सेल थेरपी आदी विविध विषयांसंबंधी सावरकरांची भूमिका मांडण्यात आले व संबंधित मुद्द्यांवर सहभागी वक्त्यांचे नेमके मतकाय, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. श्रद्धा व अंधश्रद्धेबाबत केशव उपाध्ये म्हणाले की, कुंभमेळ्यातल्या खर्चाबाबत टीका केली जाते. पण तिथे होणारा खर्च हा श्रद्धेच्या अंगाने नव्हेतर तिथे होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत लक्षात घ्यायला हवा. शिवाय शबरीमला प्रकरणातही आम्हाला न्यायालयाची भूमिकामान्य आहे, परंतु, लोकभावनेचाही आदर करायला हवा. आम्ही नेहमीच सावरकर विचारांवर चालत आलो व म्हणूनच आमच्याच सरकारच्याकाळात शनीशिंगणापूरच्या मंदिरात व कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात महिलांना प्रवेश मिळाला. तसेच संघ आपल्या सामाजिक कार्यातूनसावरकरांचे विचार पुढे नेत आहे, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

आपल्या देशात छद्मविज्ञानाची अनेकानेक उदाहरणे दिली जातात. पण ते कधीही सिद्ध होत नाही. कारण आपल्याकडे संबंधित विषयाचेदस्तऐवजीकरण केलेले नसते. मात्र, गोवळकोंड्याचा किल्ला वा गोल घुमट वा लोहस्तंभाच्या उभारणीमागे नक्कीच काही शास्त्र असेल, असेहीयावेळी बाळ फोंडके म्हणाले. डॉ.रणजित सावरकरांनी आपली सावरकर विचारांशी शंभर टक्के बांधिलकी असल्याचे सांगत म्हटले की, सावरकर क्रांतिकारक होते, ते नेतेनव्हते. पण हीच गोष्ट त्यांना लोकांसमोर पक्ष म्हणून जाताना मारक ठरली, असेही सांगितले. शिवाय, गोपूजन व गोपालनाबाबतची सावरकरांचीभूमिका योग्य व मान्य असल्याचेही स्पष्ट केले.

 

द्वारकानाथ संझगिरी यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन करताना सावरकरांचे विचार, मत व ऋुमिकेबाबत प्रश्न विचारले. तसेच सावरकर विचारप्रत्यक्षात आणण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमावेळी सावरकरांबद्दल माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे गौरवोद्गारव माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पु. ल. देशपांडे, शरद पवार यांची नेमकी काय मते होती, तेही दाखवले.

 

कोणतीही गोष्ट देवावर सोडणे ही अंधश्रद्धा

डॉ. बाळ फोंडके यांनी सावरकरांच्या विज्ञाननिष्ठा व बुद्धीप्रामाण्याशी सहमत असल्याची भूमिका मांडली. ते म्हणाले की, कोणतीही गोष्टदेवावर सोडणे व काहीही प्रयत्न न करणे ही अंधश्रद्धा झाली पण तुम्ही स्वत: प्रयत्न करताना सुरुवातीला ईश्वराचे नाव घेतले तर तिला श्रद्धाचम्हणावे लागेल. सोबतच गायीच्या उपयुक्ततेचे वैज्ञानिक व शास्त्रीय पुरावे समोर आणल्याशिवाय तिच्या मलमुत्राने अमूक तमूक फायदे होतात,असे म्हणता येणार नाही, असेही स्पष्ट केले.

 

सावरकरांना भारतरत्न देणार का.?

 

स्वा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणार का, असा प्रश्न उपस्थितांपैकी एकाने केशव उपाध्ये यांना विचारला. यावर उपाध्ये यांनी संगितलेका, ज्यावेळी सावरकरांची जयंती वा पुण्यतिथी असते, त्यावेळी केवळ भाजपचेच नेते व कार्यकर्ते सावरकरांना अभिवादन करतात, अन्यपक्षांचे नेते तिथे नसतात, असे सांगितले. सोबतच आम्ही गेल्या साडेचार वर्षांपासून सावरकर विचार प्रत्यक्ष कृतीत आणत आहोत. इतकेच नव्हेतर सावरकरांचे भारताने अणूबाॅम्ब तयार करावा, असे म्हणणे होते, तेही अटलजींच्या काळात आम्ही साकारले. संरक्षण सिद्धता वपरराष्ट्रसंबंधाबाबतही विद्यमान सरकार सावरकरांच्याच मार्गाने सुरु आहे, असे सांगितले. म्हणूनच सावरकरांना भारतरत्न दिला जावा, अशीलोकभावना आहे, तिचा आदर आम्ही करतो, असेही म्हटले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@