संजय लीला भन्साळी आणि सलमान १९ वर्षांनी एकत्र!
महा एमटीबी   23-Feb-2019

 

 
 
  
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे दोघे तब्बल १९ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. ‘बॉलिवुडचा भाईजान’ अशी ओळख असलेला सलमान खान सातत्याने अॅक्शनपट सिनेमे करत आहे. बऱ्याच काळापासून बॉलिवुडच्या या ‘प्रेम’ने प्रेमकथेवर आधारित सिनेमा केलेला नाही. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या निमित्ताने हा योग जुळून येत आहे.
 
 
 
 

सलमान खानने १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमात संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम केले होते. ‘हम दिल दे चुके सनम’ हा सिनेमा त्याकाळी सुपरहिट ठरला होता. त्यानंतर पुढे अनेक वर्षे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी पुन्हा एकत्र काम केले नाही. पण आज तब्बल १९ वर्षांनी एका प्रेमकथेवर आधारित सिनेमाच्या निमित्ताने ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमामध्ये सलमान खान अभिनय करणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

 
 
 

यावर्षी या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित हाईल. अशी माहिती मिळाली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या एकाच वेळी आपल्या आगामी तीन प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. त्यांच्या या तिन्ही सिनेमांमध्ये बॉलिवुडमधील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सलमान खान या तीन सिनेमांपैकी एका सिनेमाचा भाग आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat