‘केसरी’चा अविश्वसनीय ट्रेलर पाहिलात का?
महा एमटीबी   21-Feb-2019


 
 
 
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘केसरी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि १० हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या अभूतपूर्व युदधावर आधारित ‘केसरी’ हा सिनेमा आहे. सारागढीची लढाई ही भारतीय इतिहासातील आजवरची लढलेली सर्वात धाडसी लढाई मानली जाते.
 

अभिनेत्री परिणीती चोप्रा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटच्या २१ शूरवीरांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत निकराने लढा दिला. या २१ शूरवीरांची अविश्वसनीय शौर्य गाथा ‘केसरी’ या सिनेमातून दाखविण्यात येणार आहे. “आज मेरी पगडी भी केसरी, जो बहेगा वो मेरा लहु भी केसरी, और मेरा जवाब भी केसरी.” अक्षयने म्हटलेल्या या संवादाचे आणि ‘केसरी’च्या ट्रेलरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

 
 
 
 

२१ मार्च रोजी ‘केसरी’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अक्षयकुमारसाठी ‘केसरी’ हा आजवरचा सर्वात महत्वाकांक्षी सिनेमा आहे. अक्षय कुमारने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच यावर्षी प्रदर्शित होणारा अक्षयचा हा पहिलाच सिनेमा असल्याने अक्षयचे चाहते ‘केसरी’ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘केसरी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे पाहण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat