सई ताम्हणकरच्या ‘पाँडिचेरी’चे पोस्टर प्रदर्शित
महा एमटीबी   02-Feb-2019

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ‘पाँडिचेरी’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सिनेमाचे संपूर्ण शूटिंग हे पाँडिचेरीमध्येच होणार आहे. या सिनेमाचे ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. सईसोबत या पोस्टरमध्ये अभिनेता वैभव तत्ववादी दिसत आहे. या सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकरचा नो मेकअप लूक असल्याने प्रेक्षकांना तिला विदाऊट मेकअप पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे आयफोनवर शूट केलेला हा पहिलाच सिनेमा असणार आहे.
 
 

 
 

या सिनेमाचे शूटिंग करताना मला एखाद्या वर्कशॉपसारखा अनुभव आला. सिनेमाची संपूर्ण प्रोसेस मी खूप छान एन्जॉय केली. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात असा एक तरी सिनेमा यायलाच हवा. जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तो अनुभव खूप निराळा आणि मस्त असतो.” असे ‘पाँडिचेरी’ या सिनेमाविषयी सांगताना सईने म्हटले. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर हे समीकरण पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वजनदार’ हा सिनेमामध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते. आता ३ वर्षांनी दोघे पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/