रुप्याचं रूप खुलवी...रूपेरी!
महा एमटीबी   02-Feb-2019

 

प्रत्येक धातूचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य असतं. सोनं, प्लॅटिनम मौल्यवान पण फक्त शोभेचे, दागिने घडवण्यासाठी उपयुक्त. तांबं-पितळ दिसायला सुंदर पण देवपूजेच्या आणि स्वयंपाकाच्या भांड्यांपुरते उपयोगी. लोखंड, कथिल सर्वसामान्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाणारे मात्र विशेष मूल्य नसणारे. पण मौल्यवान असूनही देवांच्या मूर्तींपासून, पूजेच्या उपकरणांपर्यंत, शोभेच्या वस्तूंपासून दागिन्यांपर्यंत आणि श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा, घराघरात स्थान असणारा धातू म्हणजे चांदी - ज्याला रजत, रौप्य, रुपं अशा विविध नावांनी ओळखलं जातं असा हा पांढर्‍या रंगाचा, उजळ कांतीचा, मृदू धातू आहे.
 

चांदीमध्ये पंचमहाभूतांपैकी तेज आणि वायू तत्त्वाचं प्रमाण अधिक असून सत्त्व आणि रज या गुणांचं प्राबल्य यात असतं. त्यामुळेच हा धातूला अध्यात्मशास्त्रात आणि सोंदर्यशास्त्रातही महत्त्व आहे.

 

देव्हार्‍यातल्या देवांच्या मूर्ती, पूजेचा कलश, फूलपात्र, घंटा, देवांचे अलंकार, देवांच्या वरील छत्रं चांदीची असतात. बर्‍याच देवळांच्या गाभार्‍याचे दरवाजे आणि पालख्या चांदीच्या पत्र्याने मढवलेल्या असतात. भोजनासाठी ताट, वाटी, भांडं अशा रोजच्या वापराच्या वस्तू दागिन्यांमध्ये बाळाच्या पायातला वाळा, स्त्रियांच्या पायांतले पैंजण, कंकण, हार आणि इतर दागिने, दिवाणखान्यातल्या शोभेच्या वस्तू अशा विविध ठिकाणी चांदीचा मोठ्या प्रमाणावार उपयोग झालेला दिसतो. पूर्वीच्या काळी काही राजघराण्यांमध्ये चलनातली नाणीदेखील चांदीची होती.

 

 
 

या धातूचा वातावरणाशी संपर्क आल्यानंतर हवेतल्या हायड्रोजन सल्फाइडमुळे (H2S) रासायनिक अभिक्रिया होऊन चांदीवर काळसर थर जमा होतो. त्यामुळे चांदीच्या सौंदर्याला बाधा येते. हा काळा थर रासायनिक अभिक्रियेचा असल्याने इतर भांडी घासायच्या साबणाने दूर होत नाही. चांदी हा मृदू धातू असल्यामुळे डाग घालवण्यासाठी घासल्यास त्यावर चरे पडतात आणि चांदीची झीज होते. त्यामुळे सर्वसाधारणपणे ज्वेलर्सकडे नेऊन ही भांडी किंवा दागिने साफ करवून आणले जातात. पण यामध्ये अ‍ॅसिड बाथ देऊन चांदी साफ केली जात असल्याने मौल्यवान चांदीची झीज होते. चांदीचा आजचा बाजारभाव बघता ही झीज परवडणारी नाही. शिवाय पूजेतले देव आपण घराबाहेर सफाईसाठी नेऊ शकत नाही.

 

या समस्येवर सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चं रूपेरी इन्स्टंट कॉन्टॅक्ट सिल्वर शाइन लिक्विङ. याचा वापरही अतिशय सोपा आहे. रूपेरीचे काही थेंब कापसावर किंवा मऊ सुती कापडावर घेऊन हलक्या हाताने काळ्या पडलेल्या चांदीच्या भांड्यावर फिरवताच हायड्रोजन सल्फाइडचा थर मुक्त झाल्याने एक विशिष्ट गंध जाणवतो आणि डाग क्षणात नाहीसे होतात. त्यानंतर भांडे साबणाच्या पाण्याने व नंतर साध्या पाण्याने धुऊन स्वच्छ कपड्याने पुसून कोरडं केल्यावर चांदीची चमक काही दिवस टिकून राहील.

 

यात कोणत्याही प्रकारचं घातक रसायन नसल्यामुळे चांदीची अजिबात झीज होत नाही. तसंच यात कोणताही प्राणिजन्य घटक वापरलेला नसल्यामुळे देवपूजेसाठीही ते सहजपणे वापरता येतं. हातांवरही त्याचा कोणताही परिणाम होत नाही. रूपेरीच्या द्रव स्वरूपामुळे दागिन्यांमधील बारीक नक्षीकाम, व कानाकोपर्‍यातले काळे डागही सहजपणे दूर करता येतात. रूपेरी लिक्विड बाटलीत बराच काळ उत्तम स्वरूपात टिकून राहातं.

 

अशा या रूपेरीच्या वापराने, लवकरच येणार्‍या माघी गणेशचतुर्थीनिमित्त होणार्‍या पूजेसाठी वापरायची चांदीची भांडी आता सहजपणे आणि घरच्या घरी नव्यासारखी लखलखतील, ती देखील विना घट!

 
  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/