अनोखी प्रेमकहाणी सांगणारा ‘फोटोग्राफ’
महा एमटीबी   19-Feb-2019

 

 
 
 
मुंबई : ‘फोटोग्राफ’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांची जोडी ‘फोटोग्राफ’ द्वारे प्रेक्षकांना पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. गेट वे ऑफ इंडियाला भेट देणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढून आपला उदरनिर्वाह चालवणारा नवाज आणि सी.एचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सान्या या दोघांची अनोखी प्रेमकहाणी या सिनेमात दाखविण्यात आली आहे.
 
 
 
 

‘फोटोग्राफ’च्या रंजक ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. रितेश बत्रा यांनी ‘फोटोग्राफ’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये रितेश बत्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लंचबॉक्स’ या सिनेमाला सिनेसमीक्षकांची पसंती लाभली होती. ‘फोटोग्राफ’ हा सिनेमा यंदाच्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला आहे. येत्या १५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat