डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला
महा एमटीबी   18-Feb-2019

 

 
 
 
 
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित टीव्ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘भीमराव एक गौरव गाथा’ असे या मालिकेचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास छोट्या पडद्यावर दाखविण्याचे शिवधनुष्य स्टार प्रवाह वाहिनीने उचलले आहे.
 
 
 
 
 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले महान कार्य या मालिकेतून दाखविण्याचा प्रयत्न स्टार प्रवाह वाहिनीकडून केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिवशी १४ एप्रिलपासून भीमराव एक गौरव गाथा ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. या मालिकेची घोषणा स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आली. मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्यक्तिरेखा कोणता अभिनेता साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat