पुलवामा घटनेच्या निषेधार्थ भुसावळ शहर बंद
महा एमटीबी   16-Feb-2019

पक्षविरहित रॅलीने शहर दणाणले

 

 
 
भुसावळ: पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ४४ जवान शहिद झाले. या घटनेच्या निषेधार्थ १६ रोजी शहरात सर्वपक्षीय , संघटना, समाजसेवकांनी एकत्रित रॅली आयोजित केली.
 
 
अष्टभुजा मंदिरापासून सुरु झालेली ही रॅली, नृरसिंह मंदिर, मरिमाता मंदिर, लक्ष्मी चौक, गांधी चौक, अमर स्टोअर्स मार्गे उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयावर गेली. येथे शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या रॅलीचे वैशिष्ट म्हणजे सर्व धर्मिय नागरिक, व्यापारी , राजकिय पक्षांचे पदाधिकारी आणि युवक बहुसंख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोप प्रसंगी केवळ श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली. कोणतेही भाषण यावेळी केले गेले नाही. तसेच रॅलीतील ५ प्रतिनिधींनी उपविभागीय प्रातांधिकार्‍यांना निवेदन दिले. या प्रसंगी आ.संजय सावकारे यांनी सुध्दा पुढाकार घेवून निवेदन स्विकारले
 

 
 
या निवेदनामध्ये १४ रोजी पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखिव पोलीस दलाचे ४४ जवान शहिद झाले. या भ्याड हल्ल्याचा निषेध कितीही केला तरी कमीच आहे. अनेक दशकांपासून भारतीय नागरिक जम्मु - काश्मिरमधील दहशतवाद सहन करत आहे. देशाचा कोट्यावधींचा निधी आणि मनुष्यबळ काश्मिरमध्ये खर्च होवून उपयोग शुन्य होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व समस्येचे मुळ जम्मु-काश्मिरला लागु असलेला विशेष राज्याचा दर्जा आहे. सरकारने एकतर या राज्याचा विशेष दर्जा काढून टाकावा अथवा पाकिस्थानचा सोक्षमोक्ष लावावा. तसेच मानवाधिकार कायद्याचा आधार घेवून जे लोक आतंकवाद्यांचे समर्थन करतात अशांवर देशद्रोहाचे खटले भरण्यात यावी . अशी मागणी करण्यात आली आहे.
 
या निवेदनावार व्यापारी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, शहरातील समस्त नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.