तथाकथित धर्मनिरपेक्षीयांवर सोनू निगमचा हल्ला!
महा एमटीबी   16-Feb-2019

 

 
 
 
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. याबाबत देशभरात शोक व्यक्त होत आहे. या हल्ल्याचा बदला घ्या. असा संताप देशभरातून व्यक्त केला जात आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने देशात स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या लोकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोनू निगमने आपला एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.
 

नमस्ते, भारतीयांनो, मी असे ऐकले आहे की काही सीआरपीएफचे जवान शहीद झाले त्याबद्दल तुम्ही दु:ख व्यक्त करत आहात. किती लोक होते ते? ४४ असोत किंवा ४४० तुम्हाला का दु:ख होत आहे ? तुम्ही ते करा, जे या देशात केले जाते, जे धर्मनिरपेक्षवादी लोक करतात. या घटनांबाबत दु:ख व्यक्त करणे हे रा.स्व.संघ, भाजप, हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रवादी संघटनांवर सोडून द्या. धर्मनिरपेक्ष लोक जे करतात, तेच तुम्ही करा. तुम्हाला भारतात राहायचे असेल तर भारत तेरे तुकडे होंगे,...अफजल हम शर्मिंदा है.असे धर्मनिरपेक्ष विचार तुम्ही ठेवले पाहिजेत. येथे वंदे मातरम बोलणे, सुद्धा चुकीचे आहे. सीआरपीएचे जवान शहीद झाले आहेत. यात कोणती मोठी गोष्ट आहे? इथे नमस्ते सुद्धा बोलू नका...लाल सलाम.” असे सोनू निगम याने आपल्या या व्हिडिओत म्हटले आहे. असे म्हणत गायक सोनू निगमने भारतातील स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या लोकांवर टीका केली आहे.

 
 
 

सीआरपीएफचे जवान शहीद झाल्याबद्दल देशभरातून दु:ख व्यक्त होत आहे. असे असताना देशातील स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या लोकांना विसरून चालणार नाही. आपल्या देशात वंदे मातरमला विरोध केला जातो. असे सोनू निगमचे म्हणणे आहे. सोनू निगमच्या या फेसबुक व्हिडिओला अनेकांचा प्रतिसाद मिळत आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘भारत तेरे तुकडे होंगे’ सारख्या संघटनांना पाठिंबा देणाऱ्यांवर सोनू निगमने या व्हिडिओद्वारे निशाणा साधला आहे. बॉलिवुडमधील अनेकजण मानवाधिकाराच्या गोष्टींवर चर्चा करतात. परंतु अशा भ्याड हल्ल्यांच्यावेळी मात्र ते कोणत्याही प्रतिक्रिया देत नाहीत. असे सोनू निगमच्या या व्हिडिओतून स्पष्ट होते.