मूठभर लोकांसाठी तुम्ही पाकिस्तानला दोष का देता? असा प्रश्न सिद्धूने विचारला होता. मी या हल्ल्याचा निषेध करतो. पण पाकिस्तानशी चर्चा करून हा प्रश्न सोडवायला हवा. असे वक्तव्य सिद्धूने केले होते. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी सिद्धूला चांगलेच खडेबोल सुनावले. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याचा बदला घ्या, पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या. अशी मागणी देशभरातून केली जात आहे. असे असताना पाकिस्तानसोबत चर्चा करायला हवी, अशी भूमिका नवज्योत सिंग सिद्धूने घेतल्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला.
#Boycottsidhu असा हॅशटॅग सोशल मीडिया यूजर्सनी ट्विटरवर चालवला. ‘सोनी एन्टरटेनमेंट’ चॅनेलने सिद्धूची या कार्यक्रमातून तातडीने हकालपट्टी केली असून ही हकालपट्टी कायमस्वरूपी करण्यात आल्याचे चॅनेलकडून सांगण्यात आले आहे. कपिल शर्मा शो मध्ये आता सिद्धूची जागा अर्चना पूरणसिंग घेणार असल्याचे कळते. अर्चना पूरणसिंगने या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली असून दोन एपिसोड्सचे शूटिंगही पूर्ण झाले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु सिद्धूच्या जागी आता अर्चना पूरणसिंग दिसणार याबाबत अधिकृत माहिती चॅनेलने अद्याप दिलेली नाही.
माहितीच्यामहापुरातरोजच्यारोजनेमकामजकूरमिळविण्यासाठीलाईककरा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat