मुंबई : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात देशभरात संतापाचे वावटळ उठले आहे. अनेक कलाकारांनी फेसबुक, ट्विटरच्या माध्यमांतून आपल्या भावना व्यक्त केल्या. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी कराची दौरा रद्द केला आहे. दोघांनीही ट्विटरवरून ही माहिती दिली.
Kranchi art council had invited. Shabana and me for a two day lit conference about Kaifi Azmi and his poetry . We have cancelled that . In 1965 during the indo Pak war Kaifi saheb had written a poem . “ AUR PHIR KRISHAN NE ARJUN SE KAHA “
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) February 15, 2019
कराची आर्ट कॉन्सिलने जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कराची साहित्य संमेलनासाठी आमंत्रित केले होते. त्यांनी ते स्वीकारलेदेखील होते. यासाठी ते २ दिवसाच्या कराची दौऱ्यावर जाणार होते. मात्र पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दोघांनीही पाकिस्तानमधील या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम २३ आणि २४ फेब्रुवारीला होणार आहे.
Will there be no let to these heinous attacks?These mindless killings.this utter disregard for human lives?Extremely shocking news coming from Pulwama.I strongly condemn the worst terror attack on CRPF convoy and stand united with the grieving families
— Azmi Shabana (@AzmiShabana) February 14, 2019
जावेद अख्तर यांनी ट्विट करत कराची साहित्य महोत्सवात जाण्याचा निर्णय रद्द केल्याची माहिती दिली आहे. "सीआरपीएफ जवानांविषयी माझ्या मनात आदर आहे. मी त्यांच्यासाठी एकदा गाणेही लिहिले होते. काही सीआरपीएफ जवानांना मी प्रत्यक्षातही भेटलो आहे त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत." असे लिहित पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तर शबाना आझमी यांनीदेखील ट्विटच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याचा निषेध केला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/