विक्रांतचा डाव त्याच्यावरच उलटणार?
महा एमटीबी   14-Feb-2019

 

 
 
 
 
मुंबई : ‘तुला पाहते रे’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. विक्रांत आणि इशाच्या लग्नानंतर मालिकेने एक नवे वळण घेतले आहे. मालिकेतील विक्रांत सरंजामेचे खरे रुप नुकतेच प्रेक्षकांसमोर आले. विक्रांतचे इशावर खरे प्रेम नसून केवळ सरंजामेंची प्रॉपर्टी बळकविण्यासाठी त्याने इशाशी लग्न केलेले असते. हे सत्य आता प्रेक्षकांसमोर आले आहे. विक्रांत त्याचा पुढचा सगळा प्लान झेंडेना समजावून सांगतो.
 
 
 
 

विक्रांतच्या या नव्या प्लाननुसार, इशा हिच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे तो घरातील सगळ्यांना पटवून देणार आहे. घरातील सर्व सदस्यांचा या गोष्टीवर विश्वास बसल्यावर आईसाहेब सरंजामेंची सगळी प्रॉपर्टी इशाच्या नावावर करतील आणि मग इशा विक्रांतवरच्या प्रेमापोटी सगळी प्रॉपर्टी विक्रांतच्या नावावर करेल. असा विक्रांतचा प्लान आहे. परंतु विक्रांतचा हा प्लान त्याच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. जेव्हा विक्रांत इशाला राजनंदिनीच्या भूतकाळातील घटनांची आठवण करून देईल. तेव्हा इशाला राजनंदिनीचे आयुष्य आठवेल आणि विक्रांतने तिचा कशाप्रकारे छळ केला होता. हेदेखील आठवेल. राजनंदिनीच्या मृत्युला विक्रांतच जबाबदार असल्याचे इशाला कळेल आणि विक्रांतला धडा शिकविण्याचे इशा ठरवेल.