‘अनुलोम मित्रसंगम’
महा एमटीबी   13-Feb-2019

 

 
 
 
 
त्तर मुंबई कांदिवली येथे ठाकूर महाविद्यालयामध्ये ‘अनुलोम मित्रसंगम’ कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरले. त्यावेळी अनेक प्रश्न मनात आले होते. सगळ्यात मोठा प्रश्न होता की अनुलोमचे शुभचिंतक, सहकार्य करणारे नागरिक रविवारी सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने येतील का? दुसऱ्या उपनगरामध्ये यापूर्वी ‘अनुलोम मित्रसंगम’ कार्यक्रम झाला होता. नागरीकांनी त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबईचा कार्यक्रमही तशाच ताकदीचा असणार हे नक्की होतेच.  
 
त्या तयारीला आम्ही एकाग्रतेने लागलो. लोकांना भेटायला जायचो, कार्यक्रमाविषयी सांगायचो. त्यावेळी समोरची व्यक्ती म्हणायची, “अनुलोम फार महत्वाचे काम करते आहे. समाजाला जे गरजेचे आहे ते काम करते आहे. त्यामुळे आम्ही नक्की येणार. निश्चिंत रहा.” अनुलोम शुभचिंतकांनी अनुलोमच्या कामाची पावतीच दिली होती. या सर्वांच्या पाठबळावर अनुलोम मित्र संगम कार्यक्रम ठरला आणि यशस्वीही झाला. दि.१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ‘वस्ती-स्थानमित्र’ येण्यास सुरुवात झाली. नोंदणी झाल्यावर चहा-नाश्ता करून सर्वांनी ‘वस्ती मित्रां’च्या स्टॉल्सना भेट दिली. संस्कार वर्गातील मुलींकडून बसवलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावर दिलीप धारूरकर (माहिती आयुक्त), मुकेश खन्ना, सागर रेड्डी व जयंत कंधारकर उपस्थित होते. एकून ८७० अनुलोम मित्र यावेळी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी वस्तीमित्रांनी स्वयंरोजगाराचे विविध स्टॉलही लावले होते.
 

‘प्रेरणा’ विषयावर मुकेश व सागर यांनी खूप प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यानंतर अतुल राजोळी यांनी ‘स्वयंरोजगार’ या विषयावर मार्गदर्शन केले. माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी समारोप केला. पसायदानाने सांगता झाली. सर्वांनी जाताना अभिप्राय लिहिला. अभिप्राय पत्रात तीन विषयावर मत विचारले होते. १. सरकारी योजनांच्या प्रशिक्षण वर्गासाठी इच्छुक.२. तुम्हाला कोणत्या व्यवसायात जायचे आहे. ३. संस्कार वर्ग प्रशिक्षणामध्ये आवड आहे का? या सर्व प्रश्नांना लोकांनी छान प्रतिसाद दिला. त्यामुळे कार्य योजना म्हणून १७ मार्चला शासकीय योजना प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये संस्कार वर्ग प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमामधून प्रेरणा घेऊन उत्तर मुंबईमध्ये लागलीच ७ संस्कारकेंद्र सुरू झाले आहेत.

 

- अरविंद शिंदे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/